13 वर्षीय पिडितेला व तिच्या आईला जिवंत जाळण्याची धमकी… नगरमधील प्रकार

0
944

नगर शहरात वास्तव्यास असलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने पिडीतेसह तिच्या आईला जिवंत जाळण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप अंबादास गर्जे (रा. चिलेखनवाडी, ता. नेवासा) असे अत्याचार केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गर्जे हा पिडीतेच्या आईसोबत काम करत असल्याने तो पिडीतेच्याच घरी राहत होता. काही दिवसांपूर्वी आरोपी गर्जेने पिडीतेला आपण लग्न करू, मी तुला सुखात ठेवील असे सांगितले.

हा प्रकार पिडीतेने तिच्या आईला सांगितला असता त्याला त्यांनी घरातून बाहेर काढले होते. 9 एप्रिलला पिडीतेची आई बाहेर गेली असता आरोपीने पिडीतेवर बळजबरीने अत्याचार केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास पिडीतेसह तिच्या आईला जिवंत जाळण्याची धमकी दिली. तोफखाना पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत