जिल्ह्यातील ४ गुन्हेगारी टोळ्यांना एक वर्षासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
केडगावच्या दुधसागर सोसायटीत राहणारा सराईत गुन्हेगार अविनाश विश्वास जायभाय, त्याच्या टोळीतील सदस्य ऋषिकेश अशोक बडे व नितीन उर्फ किरण किसन लाड (दोघे रा.भगवानबाबा नगर , सारसनगर) या तिघांची टोळीला २ वर्षांकरिता, पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील सराईत गुन्हेगार अक्षय सुभाष सोनवणे यास २ वर्षांकरिता तर संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा प्रमुख संदीप भाऊसाहेब घुगे याच्यासह त्याच्या टोळीतील सदस्य मारुती सगाजी नांगरे, विजय बच्चु डोंगरे, अमोल सोमनाथ डोंगरे, दिपक सोमनाथ डोंगरे, शशीकांत उर्फ मंगेश शिवाजी नांगरे या ६ जणांच्या टोळीला नगर जिल्ह्यातून १ वर्षाकरीता हद्दपार केले आहे.