कुक्कुटपालन कंपनीला ५४ लाखांचा गंडा नगर तालुक्यातील २ आरोपींना अटक

0
238

अलिबाग (जि. रायगड) येथील एका कुक्कुटपालन कंपनीला नगर तालुक्यात तब्बल ५४ लाखांचा गंडा घालणाऱ्या आणखी २ आरोपींना नगर तालुका पोलिसांनी मंगळवारी (दि.१०) अटक केली आहे. दीपक रंगनाथ भोर व सुहास किसन महांडुळे (दोघे रा.भोरवाडी ता.नगर) अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात ३ दिवसांपूर्वी महेश बबन भोर (वय ३५ रा. निमगाव वाघा ता. नगर) यास नगर तालुका पोलिसांच्या पथकाने याला इस्लामपूर (जि. सांगली) येथून पकडलेले आहे.

नगर तालुक्यातील शेतकर्‍यांनी कुक्कुटपालनसाठी अलिबाग येथील प्रिमीयम चीक फिड्स कंपनीकडून आणलेल्या सुमारे साडेसोळा हजार पिल्लांची कंपनीच्या कर्मचार्‍यांशी संगनमत करून परस्पर विक्री करण्यात आली होती. तसेच करारनाम्याच्या मूळ प्रतींची चोरी केली. या प्रकारात कंपनीची ५४ लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिसांत पोल्ट्री चालक व कंपनीतील कर्मचारी अशा १० जणांविरोधात फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.