डीजेचा आवज घुमू लागला की लोक ठेका धरतात. डीजेच्या तालावर अनेकदा नागिन डान्स केला जातो. हा नागिन डान्स इतका फेमस आहे की कुठेही डीजेचा आवाज आला की लोक नागिन डान्सच करातात. या नागिन डान्सचे विविध व्हीडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या अश्याच एका नागिन डान्सचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सध्या सोशल मीडियावर एका नागिन डान्सची जोरदार चर्चा आहे. यात एक दारूच्या नशेत तल्लीन असलेला व्यक्ती नागिन डान्स करताना पाहायला मिळत आहे. डीजेवर नागोबा डुलाया लागला हे गाण लागलं आहे. त्याचवेळी हा दारूडा जमीनीवर पडलेला पाहायला मिळतोय. जसं गाणं सुरू होतो तसा हा व्यक्ती नाचायला लागतो. नाचतो कसला गडागडा लोळायला लागतो. त्याला असं रस्त्यावर लोळता लोळता तो रस्त्यावरून खाली कोसळतो.अन् शेजारच्या शेतात जाऊन पडतो. शेजारच्या मक्याच्या शेतात जाऊन तो पडतो. त्याला उचलण्यासाठी गावातली मंडळी जातात. पण तो त्यांना जुमानत नाही. तो उभं राहून डान्स करण्याचा प्रयत्न करतो. पण दारू त्याला इतकी चढली आहे की त्याला स्वत:चा तोल सांभाळता येत नाही. तो वारंवार खाली पडतो.






