मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाआणि देशभरातील सिनेमागृहांनी १६ सप्टेंबर रोजी भारतात ‘राष्ट्रीय सिनेमा दिन’ साजरा करण्याचा आणि ७५ रुपयांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या मुंबईसह दिल्ली आणि अन्य शहरांमध्ये सरासरी तिकिटांची किंमत २०० ते ३०० रुपये आहे. पीवीआर, आईनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, मिराज आणि सिटीप्राइड, एशियन, मुक्ता ए२, मूवीटाइम, वेव, एम२के आणि डेलाइटसारख्या चित्रपटगृहांसह देशभरात सुमारे ४ हजार स्क्रीन्स आहेत, ज्यांची तिकिटं ७५ रुपयांनी विकली जातील.राष्ट्रीय चित्रपट दिन सर्व वयोगटातील प्रेक्षकांना एकत्र आणेल आणि संपूर्ण दिवस चित्रपटांचा आनंद लुटता येईल. चित्रपटगृह पुन्हा सुरू झाल्याचा आनंद साजरा करू आणि ज्या निर्मात्यांनी असं केलं आहे त्यांच्यासाठी ‘धन्यवाद.’ हे आमंत्रण त्या लोकांसाठी आहे ज्यांनी अजून चित्रपटगृहात जाऊन सिनेमाच पाहिलेला नाही.’






