Video…साखर आणि गुलाबाच्या पाकळ्यांपासून असा तयार होतो ‘गुलकंद’

0
19

साखर आणि गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद बनवला जातो. गुलकंदाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे जाम आणि मुरंबासारखे दिसते. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका छोट्या कारखान्यात गुलकंद कसा बनवला जातो हे दाखवण्यात आले आहे. हा पदार्थ बनवण्याची सोप्पी पद्धत व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे. एका कारखान्यात कामगार गुलाबाच्या पाकळ्यांची मोठी पोती उघडतात. भारतातील रोझ गार्डन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमधील पुष्कर या शहरात या गुलाबांची कापणी केली जाते.गुलाब आणि साखर यांचे मिश्रण वापरण्यासाठी तयार होण्यापूर्वी दोन महिने मॅरीनेट करण्यासाठी स्टीलच्या कंटेनरमध्ये ठेवले जाते. त्यानंतर गुलकंद तयार होते. हा फॅक्टरी व्हिडिओ अमर सिरोही यांनी तयार केला आहे, जो Instagram आणि YouTube वर Foodie Incarnate नावाचे लोकप्रिय फूड व्लॉगिंग अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, गुजरातमध्ये नैसर्गिकरित्या २००० किलो गुलकंद बनवण्याचा व्हिडिओ, आयुर्वेदातील सर्वात स्वादिष्ट खाद्यपदार्थ.