पाकिस्तानच्या नदीमला मागे टाकत नीरज चोप्रा ठरला जगज्जेता! Video

0
47

भालाफेकपटू नीरज चोप्रानं रविवारी मध्यरात्री देशाला जागतिक अॅखलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दिलं. या विजयासह नीरज चोप्रानं इतिहास घडवला. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरज चोप्रानं भारताला पहिलं वहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. गेल्या वर्षी नीरज चोप्राला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमचं नीरज चोप्राला मोठं आव्हान होतं. अर्शदची आत्तापर्यंतची सर्वोत्तम भालाफेक ९० मीटरहून जास्त होती. त्यामुळे नीरजला नदीम कडवी टक्कर देणार असं चित्र दिसत होतं. झालंही तसंच. अर्शदनं पहिल्या फेरीत ७४.८० मीटर तर दुसऱ्या फेरीत थेट ८२.१८ मीटर टप्प्यापर्यंत भालाफेक केली. तिसऱ्या फेरीत तर त्यानं थेट ८७.८२ मीटरपर्यंत भालाफेक केल्यामुळे नीरजला त्याच्याही पुढे भालाफेक करण्याचं आव्हान होतं. मात्र, नदीमला लीलया मागे टाकत नीरजनं सुवर्णपदक मिळवलं!