इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये नवीन इलेक्ट्रिक ह्युंदाई क्रेटाचे अनावरण
इलेक्ट्रिक क्रेटा विविध गुणवैशिष्टये व दणकटपणामुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरेल -अरूणकाका जगताप
नगर (प्रतिनिधी)- मास मार्केट ब्रॅण्ड दरम्यान विक्री पश्चात सेवा सर्व्हिसमध्ये ग्राहकांची प्रथम पसंती मिळवणाऱ्या ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये दी ऑल न्यू ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक या कारचे अनावरण आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक विजयकुमार गडाख, जनरल मॅनेजर राजू बेजगमवार, सेल्स मॅनेजर अजय मगर, संदीप देवकाते आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अरुणकाका जगताप म्हणाले की, ह्युंदाई कंपनीने ग्राहकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन आकर्षक कारचे मॉडेल्स बाजारात आणले आहे. भारतीयांचा विचार करुन या कारची रचना करण्यात आलेली असून, एकत्र कुटुंब पध्दतीसाठी कारकडे ग्राहकांचा अधिक कल आहे. न्यू ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक विविध गुणवैशिष्टये व दणकटपणा ग्राहकांच्या पसंतीस उतरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतातील एकत्र कुटुंब पध्दतीचा विचार करुन जास्त सदस्य बसू शकतील, अशा वाहनांना पसंती मिळत आहे.अलीकडच्या काळात ही मागणी फार वाढली असून, त्यात कार निर्माता ह्युंदाई इंडिया सुध्दा देशातील बाजारात मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. ह्युंदाई इंडियाने नवीन दी ऑल न्यू हयुंदाई क्रेटा इलेक्ट्रिक कार बाजारात आनली असून, नवीन वाहनाच्या सेगमेंट मध्ये वाजवी दरात उत्कृष्ट सुविधांचा लाभ मिळणार आहे. ज्या सुविधा इतर स्पर्धक कंपन्यांच्या गाड्यांमध्ये उपलब्ध नाहीत. तसेच ओशन ब्ल्यु विथ अबयास ब्लॅक रूफ आणि ड्युल टोन या रंगांचा समावेश आहे.
क्रेटा इलेक्ट्रिक दोन बॅटरी पर्याय सह लाँच करण्यात आली आहे. 42 किलोवॅट बॅटरी जी एक चार्ज वर 390 किमी रेंज देईल आणि 51 किलोवॅट बॅटरी जी एक चार्ज वर 473 किमी पर्यंत रेंज देण्याचा दावा कंपनीने केला आहे. दोन्ही बॅटरी पॅक मध्ये समान इलेक्ट्रिक मोटर आहे. लहान बॅटरी पॅकसह ही मोटर 135 पीएस पॉवर निर्माण करते. मोठ्या बॅटरी पॅकसह ही मोटर 171 पीस पॉवर जनरेट करते. ही कार चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये एक्झिक्युटिव्ह, स्मार्ट, प्रीमियम आणि एक्ससलंस बुकिंग केली जाऊ शकते.
ही एसयूव्ही दिसायला पूर्वीपेक्षा खूपच मजबूत व आकर्षक रंगात उपलब्ध होणार आहे. नवीन क्रेटा इलेक्ट्रिक आणखी सेफ्टी सुधारण्यासाठी, कंपनीने त्यात ॲडव्हान्स ड्रेव्हिंग असिस्टंट सिस्टम (एडीएएस) समाविष्ट केला आहे. यात 70 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. यात 6 एअरबॅग्ज, व्हॉईस ऍक्टिव्हेटेड पॅनोरामिक सनरूफ, पेंडल शिफ्टर्स, पॉवर ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीट्स, हवेशीर फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जिंग पोर्ट, लेदर अपहोल्स्ट्री, साउंड सिस्टम, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर, अनुक्रमिक टर्न इंडिकेटर, ऑन-बोर्ड आहेत. नेव्हिगेशन 360-डिग्री कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. नामवंत बँका व फायनान्स कंपन्यांकडून झिरो प्रोसेसिंग फी 100 टक्के ऑन रोड फायनान्स सुविधा उपलब्ध आहे. ह्युंदाई प्रॉमिसच्या माध्यमातून ग्राहकांना जुन्या गाडीची एक्सचेंज सुविधा देण्यात आलेली आहे. दररोज ग्राहकांची बुकिंगसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सदर वाहन ईलाक्षी ह्युंदाई मध्ये डेमो व टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांनी अधिक माहितीसाठी शोरुमला भेट देऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन ईलाक्षी ह्युंदाईचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी केले आहे.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल नगर शहरात इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये नवीन इलेक्ट्रिक ह्युंदाई क्रेटाचे अनावरण






