नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीच्या पैसांचा अपहार केल्या प्रकरणातील आरोपीला नेवासा पोलिसांनी मुंबईतून अटक केली असून आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळविल्याप्रकरणी नेवासा तहसीलदार रुपेशकुमार विजयलाल सुराणा यांच्या फिर्यादीवरून देडगावचा कोतवाल अविनाश हिवाळे यांचे विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी अविनाश हिवाळे यास नेवासा पोलिसांनी मुंबईतून अटक करून न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.