न्यूजपेपरचा काही लोक आणखी काही कारणांसाठी वापर करतात. पण फ्रीजमध्ये न्यूजपेपर ठेवण्याचा असा वापर कुणीच केला नसेल किंवा कुणाला माहितीही नसेल. फ्रीजमध्ये न्यूजपेपर ठेवल्याने खूप मोठा फायदा होता. न्यूजपेपरच्या या साध्यासोप्या उपायाने तुमची खूप मोठी समस्या यामुळे दूर होईल. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल ही तर कमालच झाली.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, यात बरेच वेगवेगळ्या घरगुती टीप्स देण्यात आल्या आहेत.
ही महिला न्यूजपेपरचं एक पान घेते. त्याचा गोळा करते. तो ती पाण्यात भिजवून घेते. हा भिजवलेला न्यूजपेपरच्या पानाचा गोळा ती दुसऱ्या एका वाटीत ठेवते आणि ती वाटी फ्रीजमध्ये ठेवते.
महिलेने सांगितल्यानुसार या उपायामुळे फ्रीजमध्ये वास जातो. तुम्हाला माहिती असेल फ्रीजमध्ये काही पदार्थ ठेवल्याने त्या पदार्थांचा वास फ्रीजमध्ये येतो. फ्रीजमधील हा वास घालवण्यासाठी लोक काय काय नाही करत. प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय करतात. पण हा उपाय अगदी साधासोपा आहे.