हिंदूह्रदयसम्राट’ देवेंद्र फडणवीस, नगरच्या आक्रोश मोर्चात नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचलं?

0
686

अहमदनगर- श्रीरामपूरमध्ये भाजपच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. लव्ह जिहाद आणि आदिवासी तरुणाच्या अपहरणाच्या घटनेचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या निमित्ताने नितेश राणे यांनी हजेरी लावली असून यावेळी ते बोलत होते. या मोर्चामध्ये माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके हेसुद्धा सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी जन आक्रोश आंदोलनात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा केला आहे. यामुळे दोन दिवसापासून सुरु असलेल्या भाजप शिवसेना पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे आहेत.