Congress…देशात कॉंग्रेस मजबूत व्हावा… ही तर भाजप नेते नितीन गडकरी यांची इच्छा!

0
624

पुणे: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक मत प्रदर्शनासाठी प्रसिद्ध आहेत.‌एकीकडे भाजपने २०१४ पासून कॉंग्रेस मुक्त भारत असा नारा चालवला आहे. परंतु नितीन गडकरी यांना मात्र कॉंग्रेस पक्ष मजबूत व्हावा असं मत जाहीरपणे व्यक्त केले आहे. काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी काँग्रेसबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरलंय.

एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, “लोकशाहीसाठी काँग्रेस पक्ष मजबूत असणे आवश्यक आहे. सलग निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि पक्षाचे नेते निराश होऊन पक्ष सोडू नयेत, हीच आपली इच्छा आहे. काँग्रेस पक्ष कमकुवत होत असून देशातील मुख्य विरोधी पक्षाची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहेत, हे चांगले लक्षण नाही,” असं मत गडकरी यांनी व्यक्त केलंय.

लोकमतच्या एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, ‘लोकशाही दोन चाकांवर चालते- सत्ताधारी आणि विरोधक. प्रबळ विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज आहे, त्यामुळे काँग्रेस मजबूत असावी अशी माझी इच्छा आहे. त्याचवेळी काँग्रेस कमकुवत असताना त्याचे स्थान प्रादेशिक पक्ष घेत आहेत, जे लोकशाहीसाठी चांगले नाही. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षाची जागा घेण्यासाठी मजबूत झाला पाहिजे,’ अशी इच्छा गडकरींनी बोलून दाखवली.