Ola Electric ची एक लाखांपेक्षा कमी किंमतीची ई स्कूटर, 499 रुपयांत बुकींग

1
827

Ola Electric ओला इलेक्ट्रिक ही कंपनी या सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. कंपनीच्या बाजारात दोन इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. त्यापैकी एंट्री लेव्हल ओला एस १ इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री कंपनीने काही काळासाठी थांबवली होती. मात्र आता कंपनीने ही स्कूटर रि-लाँच केली आहे. कंपनीने ही स्कूटर ९९,९९९ रुपयांच्या इंट्रोडक्टरी किंमतीत विकणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या एस १ प्रो मध्ये जी ऑपरेटिंग सिस्टिम दिली आहे तिचा नवीन एस १ मध्ये देखील वापर करण्यात आला आहे. ओला कंपनीने त्यांच्या एस १ स्कूटरमध्ये 3KWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर १३१ किमीपर्यंतची रेंज देते. इको मोडवर ही स्कूटर १२८ किमीपर्यंतची रेंज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनीचं म्हणणं आहे की, तुम्ही कंपनीची नवीन एस १ इलेक्ट्रिक स्कूटर ४९९ रुपयांमध्ये बूक करू शकता. तसेच कंपनीने असंही सांगितलं आहे, ते त्यांच्या या नवीन ई-स्कूटरची डिलीव्ही ७ सप्टेंबरपासून सुरू करतील.

1 COMMENT

Comments are closed.