एका शेतकरी आजीचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आजी शेताच्या बांधावर तुफान डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमधील आजीची ऊर्जा पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
सहसा वय झालं की शरीर थकतं. अशात कामं करणंही अवघड होतं, पण ८० च्या वर वय असलेल्या या आजीने सर्वांना आश्चर्यचकित केलेले आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका शेतातील आहे. शेतात अनेक महिला शेतकरी काम करताना दिसत आहेत आणि अगदी कॅमेरासमोर एक आजी एका महिलेबरोबर तुफान नाचताना दिसत आहे. आजीच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होऊ शकतं. आजीचा डान्स नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.






