शाळेतील पहिलं प्रेम…आजोबांनी तब्बल 63 वर्षानंतर तिला केले प्रपोझ…व्हिडिओ

0
25

पहिलं प्रेम म्हणताच नकळत तो शाळेतला व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर येतो. अर्थात अनेकांनी आपलं हे प्रेम कधीच व्यक्त केलं नसेल. पण जर का तुम्हाला ते प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाली तर काय होईल? होय, असाच काहीसा प्रकार ७८ वर्षांच्या एका आजोबांसोबत घडला आहे. त्यांना तब्बल ६३ वर्षांनंतर आपल्या बालपणीच्या प्रेयसीला प्रपोज करण्याची संधी मिळाली. अन् त्यांनी देखील ती संधी न गमावता जणू शाहरूखच्या शैलीत आपलं प्रेम व्यक्त केलं.