कुंभ मेळाव्यासाठी जाणाऱ्या भाविकांना अडवणाऱ्या जिहादी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

0
43

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परिवहन प्रादेशिक कार्यालय नगर येथे ठिय्या आंदोलन

उत्तर प्रदेश प्रयागराज येथील कुंभ मेळाव्यासाठी जाणाऱ्या भाविकांना अडवणाऱ्या जिहादी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यावर कारवाई करा – अभिजीत खोसे

  अहिल्यानगर : उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे कुंभ मेळावा सुरू असून देशभरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी व स्नानासाठी जात आहे, मात्र अहिल्यानगर येथील परिवहन प्रादेशिक कार्यालयातील जिहादी प्रवृत्तीची अधिकारी भाविक भक्त वर्गाच्या गाड्या जाणून बुजून अडविल्या जात आहे. अशा अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी परिवहन प्रादेशिक कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करीत या अधिकार्‍यावर कारवाई करावी अन्यथा गुरुवार दि.२७ रोजी चांदणी चौक येथे रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांनी दिले.
           उत्तर प्रदेश प्रयागराज येथील कुंभ मेळाव्यासाठी जाणाऱ्या भाविकांना अडवणाऱ्या जिहादी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी परिवहन प्रादेशिक अधिकारी विनोद सगरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली यावेळी. कार्यअध्यक्ष अभिजीत खोसे, महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, युवक चे अध्यक्ष इं.केतन क्षीरसागर, संतोष नवसुपे, मळू गाडळकर, मंगेश खताळ, महेंद्र उपाध्ये आदी उपस्थित होते
         पुढे निवेदनात म्हटले होते की” सक्कर चौक अहिल्यानगर येथे एका पार्कीगमध्ये उभी असलेली प्रवासी वाहतुक बस, प्रयागराज व आयोध्या येथे भाविकांना दर्शनासाठी व शाही स्नान करण्यासाठी जात होती. त्यात असलेल्या हिदु भाविकांना आपल्या कार्यालयातील विशिष्ट समाजाच्या अधिका-यांनी जाणीवपूर्वक अडवुन त्या गाडीवर दंडात्मक कारवाई केली गेली. व त्या गाडीमध्ये असलेल्या हिंदुधर्मगुरुंना अरेरावीची भाषा वापरून “आप प्रयागराज कैसे जाते अब मैं देखती हूँ” असे म्हणुन त्या गाडीला त्या अधिका-याकडून तात्काळ दंडात्मक पावती करण्यात आली, जेणेकरून या हिंदुभाविकांना प्रयागराज येथे जाण्यापासून अडवण्यात येईल, या भावनेने त्या गाडीवर कारवाई करण्यात आलेली आहे. याबाबत समस्त अहिल्यानगरीतील हिंदु धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. आपल्या कार्यालयातील विशिष्ट समाजाच्या अधिका-यांकडून हिंदु धर्माच्या लोकांना जाणीवपुर्वक लक्ष्य केले जाते व त्यांच्यावरच दंडात्मक कारवाई केली जाते काल झालेल्या घटनेवरून हिंदु भाविकांना प्रयागराज येथे जाण्यास या अधिका-याकडून रोखण्याचा प्रकार स्पष्ट दिसून येत आहे, त्यामुळे त्या संबंधित अधिका-यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप हे सुध्दा येत्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला