OnePlus 10R..5 जी स्मार्टफोनची किंमत पुन्हा झाली कमी…

0
18

OnePlus 10R गेल्या वर्षी लाँच झालेला OnePlus 10R च्या किंमतीत दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे. यावेळी फोनच्या किंमतीत ३ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे.
वनप्लस 10आर च्या 8GB+128GB व्हेरियंटला ३८ हजार ९९९ रुपये , 12GB+256GB व्हेरियंटला ४२ हजार ९९९ रुपये , आणि 12GB+256GB व्हेरियंटला ४३ हजार ९९९ रुपये मध्ये लाँच करण्यात आले होते. परंतु, या हँडसेटच्या किंमतीत गेल्या वर्षी ४ हजार रुपयाची कपात करण्यात आल्यानंतर हा फोन अनुक्रमे ३४ हजार ९९९ रुपये, ३८ हजार ९९९ रुपये आणि ३९ हजार ९९९ रुपये किंमतीत विकला जात होता. आता या फोनच्या किंमतीत ३ हजार रुपयाची कपात करण्यात आली आहे. यानंतर या फोनच्या किंमती कमी झाल्या आहेत. अनुक्रमे ३१ हजार ९९९ रुपये, ३५ हजार ९९९ रुपये, आणि ३६ हजार ९९९ रुपये आहे. तुम्ही स्मार्टफोनला फॉरेस्ट ग्रीन आणि Sierra Black दोन रंगात खरेदी करू शकता.