कांदा अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांनी ‘या’ कागदपत्रे सादर करावी बाजार समितीच्या वतीने अवहान

0
39

कांदा अनुदान प्रस्तावाकरिता त्रिसदस्य समितीचा सही असलेला 7/12 उतारा दोन दिवसात सादर करावा – सभापती बोठे

केडगाव – कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर कडून सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की दिनांक एक फेब्रु २०२३ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी उपबाजार आवार नेप्ती येथे कांदा विक्री केले आहे . त्यास अनुसरुन शासनाने जाहीर केलेल्या अनुदानास पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी बाजार समितीचे कार्यालयात दिनांक ३ एप्रिल २०२३ते ३० एप्रिल २०२३ अखेर कांदा अनुदान प्रस्ताव सादर केले आहे. त्यापैकी ज्या शेतकऱ्यांनी प्रस्तावा सोबत जोडलेले ७ / १२ कांदा पिकांची आँनलाईन नोंदी ऐवजी हस्तलिखित कांदा पिकाची नोंद असलेला सातबारा जोडला आहे. अश्या शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केल्यानुसार सातबारा उता-यावरच तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक या त्रिसदस्य समितीचा सही शिक्का असलेला कांदा या पिकाची नोंदी असलेला सातबारा उतारा बुधवार दिनांक ७ जुन२०२३ रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत समितीच्या मुख्य कार्यालय,किसान क्रांती इमारत,पहिला मजला, मार्केट यार्ड, स्टेशन रोड, अहमदनगर येथे सादर करावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे यांनी केले आहे.