Organic farming…सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन… केंद्र सरकार करतेय ५० हजारांची मदत

0
653

नवी दिल्ली: रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे पुन्हा एकदा सेंद्रीय शेतीचे महत्व वाढत आहे. केंद्र सरकारनं याकरिता दोन वेगवेगळ्या योजना राबवल्या जाणार असून उत्पादन वाढीसाठी आवश्यक त्या साधनसामुग्रीसाठी प्रोत्साहनही दिले जाणार आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत करुन क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. आता तर या नैसर्गिक शेतीमसाठी दोन योजना राबवल्या जाणार असल्याचे केंद्रीय कृषी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी लोकसभेत सांगितले आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून 2015-16 पासून या दोन योजना सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये पारंपरिक कृषी योजना आणि ईशान्य भागातील शेतकऱ्यांसाठी मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट या योजनांचा समावेश असणार आहे. या योजनांच्या माध्यमातून पीक पेरणी करण्यापासून ते कापणी आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन असे विषय असणार आहेत. सेंद्रीय शेती वाढवण्यासाठी केंद्राचा प्रयत्न असला तरी शेतकऱ्यांनाही तेवढाच फायदा होणार आहे.

सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पारंपरिक कृषी विकास योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आणि 3 वर्षांसाठी तात्पुरती मदत करणार असल्याचे कृषी कल्याण मंत्री कैलास चौधरी यांनी सांगितले. .

सेंद्रीय शेतीची माहिती आणि त्याचे फायदे बांधावरील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने एक अॅप तयार केले आहे. यामध्ये उत्पादन, शेतीमालाचे दर आणि भविष्यातील मार्केट यासंबंधी माहिती मिळणार आहे. आतापर्यंत या अॅपच्या माध्यमातून 5 लाख 73 हजार शेतकरी हे जोडले गेले आहेत. यामध्ये किसान पोर्टल आणि त्यांच्या बायो-उत्पादनांचा तपशील अपलोड केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विक्री करणे अधिक सोईस्कर होणार आहे