‘हे’ काम तातडीने करा… अन्यथा पॅन कार्ड होईल निष्क्रिय…

0
36

आयकर खात्याने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार आधार कार्ड-पॅनकार्ड यांची जोडणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आयकर कायदा, 1961 नुसार, सर्वच पॅनकार्ड धारकांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 31 मार्च 2023 पूर्वीच आधारकार्ड-पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. 1 एप्रिल 2023 रोजीपासून पॅनकार्ड निष्क्रिय होईल.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मे 2017 मध्ये एक अधिसूचना प्रकाशित केली होती. त्यामध्ये आसाम, जम्मू आणि काश्मीर, मेघालय येथील नागरिकांना या प्रक्रियेतून सूट देण्यात आली होती. जे भारताचे नागरिक नाहीत. ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा नागरिकांनाही या श्रेणीतून बाहेर ठेवण्यात आले आहे.

यंदा 30 मार्च रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एक अधिसूचना काढली होती. त्यात एकदा पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर आयकर कायद्यानुसार त्याच्याविरोधात कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे करदात्यांसमोर तर मोठे संकट उभे ठाकणार आहे.

पॅनकार्ड निष्क्रिय झालेले करदाते प्राप्तिकर रिटर्न जमा करु शकणार नाहीत. तसेच त्यांना थकबाकीचीही प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. रिटर्नमध्ये त्रुटी असेल तर ती पूर्ण करता येणार नाही. तसेच कर कपातही जादा दराने होईल.