आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये वारकऱ्यांच्या निवासासाठी ‘संतछाया’ या भक्तनिवासाचं काम हाती घेतलंय. त्याचं भूमिपूजन राज्यातील विविध संस्थानच्या प्रमुख विश्वस्तांच्या हस्ते पार केलं. यावेळी प्रमुख दिंड्यांचे मानकरी, महाराज मंडळी, टाळकरी, फडकरी, वारकरी, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वारी ही महाराष्ट्राची अनेक वर्षांपासून चालत आलेली संत परंपरा आहे. कर्जत-जामखेसह राज्यातील वारकऱ्यांची राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून भक्तनिवासाच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळतेय, हे खरंतर माझं भाग्य आहे. या भक्तनिवासावर संतांची छाया कायम राहील,असा विश्वास आमदार पवार यांनी व्यक्त केला.






