पाणीपुरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो पाहून हीच जगातील सर्वात स्वच्छ पाणीपुरी अशी प्रतिक्रीया युजर व्यक्त करीत आहेत. एका फूड व्लॉगरने पाणीपुरी निर्मितीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. गुजरातच्या सुरत येथील कारखान्यातील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका स्वयंचलित मशिनीत पीठ मळून त्याच्या गोल पुऱ्या कापल्या जातात. त्यानंतर या पुऱ्या मोठ्या फ्रायरमध्ये तळल्या जाऊन त्यांना चाळणीत तेल गाळून कोरडे केले जाते. त्यानंतर या पाणीपुरी पॅकेटमध्ये पॅक केल्या जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत मानवी स्पर्श कुठेही दिसत नाही.