पंकजा मुंडे म्हणाल्या, “जे निवडून आले त्या सर्वांचे मी अभिनंदन करते. भाजपचे पाच, शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन व काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला आहे. त्या सर्वांचे मी अभिनंदन करते. राज्यसभेचा निकाल ज्या कलाने गेला त्यानुसार सर्वांना अपेक्षा होतीच. तसाच निकाल विधानपरिषदेचाही लागला आहे,” असे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, “संख्याबळावर केलेले काम हे समाजकारण असते. संख्याबळ नसताना केले काम हे राजकारण असते. राजकारणात दोन्हींची अवश्यकता असते. जिथे संख्याबळ कमी आहे अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही जिंकलो आहोत. जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असोत. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी एकट्याने 17 मते फोडले होते. मात्र कुठलेही सामर्थ मागे नसताना ते करून दाखविले. आता दिल्लीत नरेंद्र मोदी यांचे मोठे सामर्थ उभे आहे. विकासाची दृष्टी देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. नक्कीच याचा परिणाम झाला असेल,” असे सांगताना त्यांनी या विजयाचे श्रेय मात्र पंतप्रधान मोदींनाच दिले.
महाराष्ट्रात परिवर्तन होणार का यावर विचारले असता त्यांनी सांगितले की, “मी या प्रक्रियेचा भाग नाही. त्यामुळे याचे उत्तर मी देऊ शकत नाही,” असे म्हणत त्यांनी राज्यातील राजकारणावर बोलणे टाळले.
महाराष्ट्रात परिवर्तन होणार का यावर विचारले असता त्यांनी सांगितले की, “मी या प्रक्रियेचा भाग नाही. त्यामुळे याचे उत्तर मी देऊ शकत नाही,” असे म्हणत त्यांनी राज्यातील राजकारणावर बोलणे टाळले.