पंकजा मुंडे मौन सोडणार! 21 जून रोजी पाथर्डीत, कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागताची तयारी

0
856

विधानपरिषदे निवडणुकीत भाजपकडून पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं आहे. उमेदवारी न मिळाल्यानं पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज झाले आहेत. अशातच पंकजा मुंडे या 21 जूनला पाथर्डीतीली मोहटा देवीचं दर्शन घेणार आहेत. यावेळी त्या पाथर्डीतील भाजप कार्यकर्त्यांशी साधणार संवाद साधणार आहेत. तसेच त्या मुकुंद गर्जे या कार्यकर्त्याचीही घेणार भेट घेणार आहेत. पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर मुकुंद गर्जे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.21 जूनच्या पंकजा मुंडे यांच्या स्वागताची कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ‘चलो मोहटादेवी’ असे बॅनर सोशल मीडियावर झळकत असताना दिसत आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे यांना डावलल्याची कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त केली जात आहे. आता त्यावर पंकजा मुंडे काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळं पंकजा मुंडेंच्या दौऱ्याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.