पारनेर पंचायत समितीद्वारे शासकीय कामात झालेल्या अनियमिततेची चौकशी व्हावी..

0
26

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्मरणपत्र
अन्यथा जिल्हा परिषदे समोर उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समितीच्या माध्यमातून शासकीय कामात झालेल्या अनियमिततेची चौकशी होत नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी चौकशी करण्याचे स्मरणपत्र दिले. तर यासंदर्भात चौकशी न झाल्यास 30 जानेवारी रोजी जिल्हा परिषद समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
पंचायत समितीद्वारे झालेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या कामात अनियमितता झाली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोग कामाची दप्तर तपासणीची मागणी देखील करण्यात आलेली आहे. मौजे पळशी येथील ग्रामपंचायत मध्ये दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचा गैरवापर झालेला असताना त्याची चौकशी देखील प्रलंबीत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करुन संबंधीत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.