सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्ही नक्कीच हादरून जाल. ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशातील असल्याचं समोर आलं आहे.
अवघ्या ८ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये काही पर्यटक धबधब्याखाली आंघोळीचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यावेळी तिथं एक ढिगारा अचानक त्यांच्या अंगावर येऊन पडला आहे. काही क्षणात सर्व काही संपत.उत्तराखंड राज्यातील चमोली पोलिसांनी हा व्हिडीओ पोस्ट करत खबरदारीचं आवाहन केलं आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पर्यटकांचा एक समूह धबधब्याखाली आंघोळ करताना दिसत आहे. यामध्ये काही मुलेही दिसत आहेत. पुढच्याच क्षणी वरुन पाण्यासोबतच मातीचा एक ढिगारा अचानक त्यांच्या अंगावर पडतो. हे सर्व काही अचानक घडल्याने लोकांनाही काही समजत नाही. या दरम्यान काही लोक धबधब्याच्या पलीकडे जाण्यात यशस्वी होतात, तर बहुतेक पाण्यात अडकून राहतात. ही घटना खरंच मन हेलावून टाकणारी आहे.
बरसात के मौसम के दौरान पहाड़ो में झरनों के नीचे नहाने से बचें। pic.twitter.com/bY9Xs08zxw
— Chamoli Police Uttarakhand (@chamolipolice) August 20, 2023






