Video : काय सांगता! बाजारात आलंय चक्क अंड्याचं लोणचं….

0
17

प्रत्येक देशानुसार तेथील व्यक्तीच्या सवयी, पोशाख आणि खण्यापिण्याच्या चवी वेगवेगळ्या असतात. लोणचं प्रत्येकाला आवडतं. चांगली किंवा आवडीची भाजी नसेल तर अनेक जण लोणचं आणि चपाती खाऊन आपलं पोट भरतात. अशात सोशल मीडियावर एका अनोख्या लोणच्याचा व्हिडिओ समोर आला आहे.परदेशात अनेक व्यक्ती आपण कधी विचारही केला नसेल असे पदार्थ खातात. अशात सोशल मीडियावर एक लोणचं व्हायरल झालं आहे. कदाचित या लोणच्याचं नाव ऐकून तुम्ही इथून पुढे लोणचं खाणं बंद कराल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं हे लोणचं अंड्याचं आहे. अंडी प्रत्येक व्यक्ती खातात. अंडी खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

अनेक आजारी अशक्त असलेल्या व्यक्तींनी आहारात अंडी, दूध यांचा समावेश करावा असं डॉक्टर देखील सांगतात. अशात सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ कॅनडामधील आहे. कॅनडामध्ये अशा प्रकारे अंडी व्हिनेगरमध्ये भिजवत किंवा मुरवत ठेवतात. काही दिवस ही अंडी मुरवत ठेवल्यानंतर ती खाण्यासाठी वापरली जातात