PM Kisan yojna…शेतकर्‍यांना दिलासा..केंद्राचा ई केवायसीबाबत मोठा निर्णय…

0
1517
pm kisan sanman yojna e kyc

नवी दिल्ली :PM Kisan yojna… पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खरंतर, केंद्र सरकारने ई-केवायसी  प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विहित मुदत वाढवली आहे, जी या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य करण्यात आली आहे.

पीएम किसान पोर्टलवरील अद्ययावत माहितीनुसार, आता ही प्रक्रिया 22 मे 2022 पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते. यापूर्वी अंतिम तारीख 31 मार्च 2022 होती.

दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जवळपास 12.53 कोटी शेतकरी नोंदणीकृत आहेत. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्यासाठी ही खूप दिलासादायक बातमी आहे.