पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्यांना सोडून केली फोटोग्राफी, व्हिडीओ

0
481

१९५२ मध्ये चित्ता भारतातून नामशेष झाले होते. आता पुन्हा एकदा भारताची भूमी चित्यांनी भरली आहे. त्यांचे नवीन निवासस्थान मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय वन उद्यान बनले आहे. नामिबियातील आठ चित्ते आज पहाटे एका विशेष विमानातून ग्वाल्हेरच्या महाराजा विमानतळावर पोहोचले आणि त्यानंतर हे सर्व चित्ते लष्कराच्या तीन विशेष हेलिकॉप्टरने कुनो राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी ११.३० च्या सुमारास लीव्हर खेचून तीन चित्ते उद्यानात सोडले. सर्व चित्ते काही दिवस विशेष बंदोबस्तात राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येथील हवा-पाण्याची आणि वातावरणाची सवय झाल्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येईल.