आठ वर्षांपासून पंतप्रधान…नरेंद्र मोदींकडे संपत्ती किती…समोर आली आकडेवारी

0
1275

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपत्तीत २०२१-२२ वर्षात एकूण २६.१३लाखांची वाढ झाली आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. यानुसार, मोदींकडे कोणत्याही प्रकारची स्थावर मालमत्ता नाही. मोदींची एकूण संपत्तीत वाढ झाली असली तरी त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम आणि बॅंक बॅलन्समध्ये घट झाली आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत मोदींकडे ३६ हजार ९०० रुपये इतकी रोख रक्कम होती. त्यात घट होऊन मोदींकडे आता ३५ हजार ५२० रुपये आहेत. मोदींच्या बॅंक खात्यात ३१ मार्च २०२१ पर्यंत एकूण १ लाख ५२ हजार ४८० रुपये होते. यात १ लाख ५ हजार ९२५ रुपयांनी घट झाली आहे.आता मोदींच्या बॅंक खात्यात फक्त ४६ हजार ५५५ रुपये आहेत. पंतप्रधान मोदींच्या पोस्ट ऑफिस आणि एलआयसीमधील गुंतवणूकीत वाढ झाली आहे. २०२०-२१ वर्षात मोदींनी पोस्टमध्ये ८ लाख ९३ हजार २५१ रुपयांची तर एलआयसीमध्ये १ लाख ५० हजार ९५७ रुपयांची गुंतवणूक केली होती. मार्च २०२२ पर्यंत यात वाढ होऊन पोस्टमध्ये ९लाख ५ हजार १०५ रुपयांची गुंतवणूक आहे. तर एलआयसीमध्ये १ लाख ८९ हजार ३०५ रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय मोदींकडे १ लाख ७३ हजार किंमतीचे सोन्याचे दागिने आहेत. २०२१-२२ वर्षात मोदींच्या संपत्तीत २६ लाखांची वाढ होऊन आता ते २ कोटी २३ लाख ८२ हजार ५०४ रुपये मालमत्तेचे मालक आहेत.