PM NARENDRA MODI…मोदींना भेटण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांची लगबग…व्हायरल व्हिडिओ

0
545
pm narendra modi

PM NARENDRA MODI
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी G-७ शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची भेट घेतली. ग्रुप फोटो काढण्यापूर्वी या नेत्यांमध्ये संभाषण झाले होते. यावेळी सर्व नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी कॅनडाच्या पंतप्रधानांशी संवाद साधताना दिसले. ग्रुप फोटोनंतर मोदी आणि मॅक्रॉन यांनी मिठी मारली आणि संवाद साधला.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन अचानक येतात आणि मागून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर हात ठेवतात. पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी हस्तांदोलन करीत आहेत. तेव्हा अचानक जो बायडन मागून येतात आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मोदींना काहीतरी म्हणतात. मोदी देखील मागे वळून पाहतात आणि नंतर दोन्ही नेते हसतात. एकमेकांशी प्रेमाने हस्तांदोलन करतात, असे व्हिडिओत दिसत आहे.