पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घर व कार्यालय आतून कसे दिसते? Special Video

0
18

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी २७ डिसेंबरला नवी दिल्ली येथील 7 लोककल्याण मार्गावरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी विद्यार्थी वर्गाचा पाहुणचार केला. मोदींच्या युट्युब चॅनेलवर या भेटींदरम्यानच्या संवादाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना मोदींच्या निवासस्थानातील कार्यालय जवळून पाहण्याची संधी या विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. ख्रिसमसच्या निमित्ताने पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थी वर्गाला निमंत्रण देण्यात आले होते. व्हिडिओमध्ये मोदी त्यांच्या निवासस्थानी मुलांशी गप्पा मारताना दिसत आहेत. या विद्यार्थ्यांनी मोदींच्या निवासस्थानी पंतप्रधानांचे कार्यालय, मंत्रिमंडळ कक्ष आणि इतर अनेक खोल्या पहिल्या. व्हिडीओमध्ये काही मुले मोदींशी बोलताना आम्हाला पंतप्रधान व्हायचे आहे असे म्हणतानाही ऐकू येत आहेत.दरम्यान, मोदींच्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्यापासून १ लाख १५ हजाराहून अधिक व्ह्यूज आहेत.