‘या’ कारणामुळे क्षमता असूनही शरद पवार पंतप्रधान होवू शकले नाहीत…पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

0
42

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (८ ऑगस्ट) शरद पवार आणि काँग्रेसवर टीका केली होती. काँग्रेसने शरद पवारांना पंतप्रधान होण्यापासून रोखलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र NDA ची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. एनडीएच्या बैठकीत पंतप्रधानांकडून शिवसेना-भाजप युती तुटण्यावर भाष्य केलं. 2019 ला उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असलेली युती तोडली. भाजपने ही युती तोडली नाही, असंही मोदींनी ठणकावून सांगितलं.

देशातल्या एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा पंतप्रधान मोदी यांनी दाखला दिला. एनडीएच्या खासदारांसमोर त्यांनी हे भाष्य केलं. यापुढेही एनडीए म्हणून कायम राहण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही. त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.