जगन्नाथ मंदिरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना गाभाऱ्याबाहेर का उभं केलं?

0
17

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दिल्लीतल्या जगन्नाथ मंदिरातला एक फोटो समोर आला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे तिघेही दिल्लीतल्या जगन्नाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गाभाऱ्याच्या बाहेर उभं करण्यात आलं आणि अश्विनी वैष्णव तसंच धर्मेंद्र प्रधान यांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन देण्यात आलं. या प्रकरणी आता योगेंद्र यादव यांनी चौकशीची मागणी केली आहे. तसंच हे खरं असेल तर हा संपूर्ण देशाचा अपमान आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
दिलीप मंडल यांचं ट्वीट रिट्विट करत योगेंद्र यादव यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचं सत्य समोर आलं पाहिजे. राष्ट्रपतींसह जातीभेद झाला असेल तर संपूर्ण देशाचा अपमान आणि गंभीर अपराध आहे असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.