जिल्ह्यातील ४५ परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश
अहिल्यानगर दि.- उच्च माध्यममिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेचे आयोजन ११ फेब्रुवारी ते १८ मार्च, २०२५ या कालावधीत १६ परीक्षा केंद्रावर तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षेचे २१ फेब्रुवारी ते १७ मार्च, २०२५ या कालावधीत २९ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी उप विभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी अहिल्यानगर उप विभागाच्या महसुल स्थळसिमेच्या हद्दीतील केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरामधील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी. आय.एस.डी, फॅक्स केंद्र, ध्वनीक्षेपक, झेरॉक्स मशिन, स्कॅनिंग मशिन, मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे, वस्तु कार्यान्वित ठेवण्यात येऊ नयेत. परीक्षा उपकेंद्राच्या परिघामध्ये परिक्षार्थी म्हणून घोषित केलेले उमेदवार व परीक्षा पार पाडण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीशिवाय इतर व्यक्तींना वाहनांने अथवा पायी फिरण्यास, उभे राहण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.