चालकाला झोप आवरेना, चक्क कंडक्टरने चालवली बस.. नगर जिल्ह्यातील प्रवाशांचा जीव मुठीत धरून प्रवास.. व्हिडिओ

1
45

चक्क कंडक्टरने चालवली बस…

पुणे – श्रीरामपूर बस मधील प्रवाशांचा जीव मुठीत धरून प्रवास

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – बस चालकाला झोप येत असल्याने त्यांनी गाडीचे स्टेरिंग चक्क कंडक्टरच्या ताब्यात दिले आणि मग कंडक्टरने ती गाडी स्वतः चालवीत श्रीरामपुरात आणल्याची घटना काल घडली.प्रवाशांनी खचाखच भरलेल्या या बस मधील प्रवाशांनी राहुरी ते श्रीरामपूर चा प्रवास अक्षरशहा जीव मोठे धरून केला.या थरार नाट्य दरम्यान दोन ठिकाणी बस हेलकावे खात अपघात होता होता वाचली.
याबाबतची हकीकत अशी की शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता पुण्याहून निघालेली पुणे श्रीरामपूर बस क्रमांक एम एच 14 बीटी 3742 हे श्रीरामपूर डेपोची बस रात्री अकरा वाजता तारकपूर स्टैंड वर पोहोचली.बसला आधीच दोन तास उशीर झाला होता प्रवाशांनी याबाबत चालकाकडे चौकशी केली असता जातानाच ही बस अडीच तास उशिरा होती असे त्यांनी सांगितले तसे त्याच्या चेहऱ्यावरून त्याला झोप येत असल्याचे दिसून येत होते तारकपूर स्टॅन्ड मध्ये गाडी आल्यानंतर त्याने तिथे चहा देखील घेतला त्यानंतर गाडीचा रात्री सव्वा अकरा वाजता श्रीरामपूरकडे प्रवास सुरू झाला. झोपेची तंद्री लागलेल्या ड्रायव्हरने कशीबशी बस राहुरी पर्यंत आणली परंतु पुढे त्याला गाडी चालविणे अशक्य झाले त्यामुळे त्याने ती गाडी रस्त्याच्या कडेला लावली.कंडक्टरला त्याने झोप येत असल्याचे सांगितले मग कंडक्टर महोदयांनी स्वतः घेतला राहुरीतून बसलेल्या दोन प्रवाशांना तिकीट देखील त्यांनी स्टेरिंग वर बसूनच दिले आणि हळूहळू बस श्रीरामपूर कडे रवाना झाली राहुरी फॅक्टरीपासून पुढे रात्री सुनसान रस्ता असल्यामुळे प्रवास चालू झाला मात्र एक-दोन ठिकाणी वळणावर बसले खाल्ले गर्दीमुळे प्रवाशांनीबस खचाखच भरली होती आणि खूप उशीर झाल्यामुळे बहुतांश प्रवासी झोपेत होते अशाही परिस्थितीत कंडक्टरने ही बस श्रीरामपुरात आणली आणि एकदाचा प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
ड्रायव्हरला झोप येत असल्यामुळे त्याने कंडक्टरला गाडी चालवण्याचे सांगून शेजारच्या वाहकाच्या सीटवर स्वतःला ताणून दिले आणि तो चक्क झोपला.कंडक्टरने सुद्धा गाडी श्रीरामपूरला झालेली मात्र अशा पद्धतीने प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा गंभीर प्रकार घडल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली दुर्दैवाने जर काही पर्याय झाले असते तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याचा धोका होता महामंडळाने लांब पडल्याच्या गाड्यावर चालक पाठवताना त्यांची प्रकृती तपासण्याची गरज आहे त्यांना थकवा येत असेल तर त्यांच्या ऐवजी दुसऱ्या वाहकाला पाठवावे विशेषता सायंकाळ नंतर लांब पडल्याच्या गाड्यांना अशा पद्धतीने चालक देऊ नये तसेच ही बस चालविणाऱ्या वाहकावर तसेच चालकाविरुद्ध योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे याबाबत काही प्रवाशांनी काढलेला व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे.

1 COMMENT

  1. तो वाहक driver cum conducter असैल राव
    त्यामुळे एवढं काय त्यामध्ये आणि
    झोप येत असलेल्याने गाडी चालवली असती आणि काही अनर्थ घडला असता मग…….!!!
    मेले असते अन् ््व्डि््व्डि््व्डि्््व्््््व्डि्््व्डि््व्डि््व्डि्््व्््््व्डि्डीओ अन् बातमी …..जागेवरच

Comments are closed.