अजित पवार यांची भेट कशासाठी घेतली? आ.प्राजक्त तनपुरे यांनी केला खुलासा…व्हिडिओ

0
26

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे तथा राहुरी मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. तनपुरे अजित पवार गटात जाणार अशा चर्चाही सुरु झाल्या. मात्र या सर्व घडामोडींवर आ.तनपुरे यांनीच खुलासा केला असून आपण शरद पवार यांच्याबरोबरच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आ.तनपुरे यांनी म्हटले आहे की, अजित दादा पवार ह्यांची आज सकाळी भेट घेतल्याने माध्यमांद्वारे विविध चर्चांना उधाण आलेले आहे, त्यामुळे माझे पक्षातील सहकारी आणि कार्यकर्ते यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अजित दादांचा निरोप आल्याने मी भेट घेतली. पक्षातील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून अजित दादांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर मला आहेच. मात्र माझ्या भूमिकेत कुठलाही बदल नाही. मी आदरणीय शरद पवार साहेबांसोबतच आहे.