नागरदेवळे येथील प्रांजलला तनपुरे यांनी दाखवला राहुरीतील कचरा व्यवस्थापन प्रकल्प… व्हिडिओ

0
534

नागरदेवळे येथील कचऱ्याच्या प्रश्नावर आक्रमकपणे आपले मत मांडणारी, छोटी पण संवेदनशील कु. प्रांजल गोंधळी हिला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी नगर परिषदेचा कचरा विघटन आणि व्यवस्थापन प्रकल्प स्वतः सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत जाऊन दाखविला. हा प्रकल्प आमच्या राहुरीकरांसाठी प्रेक्षणीय स्थळ झालेला आहे.

संपूर्ण राहुरी शहर आणि परिसरातून ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा जमा केला जातो. ओल्या कचऱ्याद्वारे खत बनविण्याची तर सुका कचरा रिसायकल करून वापरण्याची स्वतंत्र यंत्रणा येथे उभारली गेली आहे. हे पाहून प्रांजलने आनंद व्यक्त केला.

मात्र आमच्या गावात कचरा व्यवस्थापनाची ही यंत्रणा नाही याचे दुःख तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होते. या लहान मुलांच्या वेदना सत्ताधाऱ्यांनी जाणाव्यात. महाविकास आघाडी सरकारने नागरदेवळे येथे नगरपरिषद स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करावा. राजकारण न करता सर्वांगीण विकासावर भर द्यावा, असे आवाहन तनपुरे यांनी केले आहे.