शेअर बाजारातील बडे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन

0
819

मुंबई : शेअर मार्केटमधील बादशाह दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं. बिग बुल नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना काही आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअरवर पैसे लावण्याने फायदा होते याचं भाकित राकेश झुनझुनवाला करायचे. त्यांनी दिलेला सल्ला हा योग्य असायचा त्यामुळे अनेकजण त्यांच्या बोलण्याकडे कान लावून असायचे. नवख्या गुंतवणूकदारांना त्यांचा मोठा आधार वाटायचा.