Redmi Note 10 Pro च्या ६ GB रॅम आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटची किंमत फ्लिपकार्टवर १५,९९९ रुपयांना लीस्ट केली आहे. हा Redmi स्मार्टफोन ICICI बँक क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय ट्रांजेक्शनद्वारे खरेदी केल्यास १००० रुपयांची झटपट सूट मिळेल. दुसरीकडे, ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड EMI ट्रांजेक्शनद्वारे हँडसेटच्या खरेदीवर १,२५० रुपयांची त्वरित सूट असेल. हा Redmi फोन डेबिट कार्ड ईएमआय १,००६ रुपये प्रति महिना वापरला जाऊ शकतो. याशिवाय एक्सचेंज ऑफर अंतर्गत स्मार्टफोनवर १२,५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.






