Redmi Note 11…शानदार फिचर्स व कमी बजेटमध्ये भारतात लॉंच

0
364

Redmi Note 11…
Xiaomi ने भारतात आपला नवीन बजेट फोन Redmi Note 11 SE लाँच केला आहे. हा फोन Redmi Note 10S ची रिब्रँडेड आवृत्ती आहे. Redmi Note 11 SE मध्ये एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये तुम्हाला ६४ MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप, MediaTek Helio G95 चिपसेट, ड्युअल स्टीरिओ स्पीकर, ३३ W फास्ट चार्जिंगसह ५००० mAh बॅटरी मिळते. Redmi Note 11SE फक्त एकाच प्रकारात लाँच करण्यात आला आहे. फोनच्या 6GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १३,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही हा फोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता – Biforst Blue, Cosmic White, Space Black आणि Thunder Purple. Note 11 SE भारतात पहिल्यांदा ३१ ऑगस्ट रोजी सादर होणार आहे. Redmi Note 11 SE ला ICICI बँक क्रेडिट कार्डवर १००० रुपयांची सूट मिळेल.