rhea chakraborty…आर्यन खानची सुटका… रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरणाचीही फेर चौकशी हवी

0
381

rhea chakraborty

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचामुलगा आर्यन खानला NCBने नुकतीच क्लीनचिट दिली आहे. आता यानंतर आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवती ड्रग केसची फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीला ड्रग केसमध्ये अटक झाली होती. रिया आणि शोविक जवळ ड्रग नव्हते सापडले होते आणि त्यांची टेस्ट देखील झाली नसल्याचा आरोप मानशिंदे यांनी केला आहे.

सतीस मानशिंदे म्हणाले की, मला राजकीय अॅंगलवर कोणतेच भाष्य करायचे नाही शिवाय मला राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्यावर देखील कोणतेच भाष्य करायचे नाही. मी एक वकील आहे. गेल्या तीन वर्षात एनसीबीनं अनेक लोकांवर कारवाई करत त्यांना अडचणीत आणण्याचं काम केलं. त्यामुळं या कारवाया करण्याऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे. त्यांनी असं का केलं याबद्दल माहिती नाही. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे, अशी मी विनंत करतो.