व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की सचिन पत्नी अंजलीसोबत कुठल्याशा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलाय. तिथं त्याच्या टेबलवर जी डीश आहे त्यावर एक मेसेज लिहिलाय, you never know who you’ll meet over a slice, हा मेसेज त्यानं आपल्या बायकोला दाखवला. त्यावेळी सचिनचे जे रोमँटिक हावभाव होते ते पाहून जणू अंजली लाजलीच. सचिन आणि अंजलीमधील ही क्यूट मूव्हमेंट पाहून चाहते प्रचंड कौतुक करत आहेत. सर्व सामान्य चाहत्यांसोबत माजी क्रिकेटपटूंनाही सचिनचा हा रोमँटिक अंदाज भलताच आवडलेला दिसतोय.