शिर्डी साई संस्थानाच्या दानपेटीत भरभरुन दान, दोन हजारांच्या तब्बल नोटा!

0
18

शिर्डी साई संस्थानाच्या दानपेटीत दोन हजारांच्या नोटांचं
भरभरुन दान; दीड महिन्यात तब्बल 12 हजार नोटा!

देशाच्या चलनातून 2 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

30 सप्टेंबरपर्यंत जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन दोन हजारांच्या नोटा बदलून घेता येणार आहेत. अशातच दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याच्या आरबीआयच्या निर्णयानंतर शिर्डीतील (Shirdi) साई मंदिराच्या दानपेटीत मात्र दोन हजारांच्या नोटांचं दान वाढल्याचं दिसून आलं आहे. एरव्ही चलनात न दिसणाऱ्या दोन हजारांच्या नोटा साईंच्या दानपेटीत मात्र भरुभरुन दान करण्यात आल्या आहेत.

अवघ्या महिन्याभरात तब्बल अडीच कोटी रुपयांच्या 12 हजार नोटा साई मंदिराच्या दानपेटीत भक्तांकडून दान करण्यात आल्या आहेत.