विभागीय आयुक्त प्राथ शिक्षकांच्या बायोमेट्रिक हजेरी साठी अनुकूल
शिक्षकांचे रोखलेले वेतन दोन दिवसात अदा करणे कामी निर्देश मिळणार
मा .डॉक्टर श्री प्रविण गेडाम साहेब , विभागीय आयुक्त नाशिक यांची अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने प्रत्यक्ष भेट घेऊन केली चर्चा
विभागीय आयुक्त डॉ.प्रवीणकुमार गेडाम साहेब व उपआयुक्त मा उज्वला बावके मॅडम यांची भेट घेऊन क्यू आर कोड उपस्थितीबाबत असलेल्या विरोधा बाबत निवेदन देण्यात आले .
यावेळी जेष्ठ शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले व राजेंद्र निमसे यांच्यासोबत ग्रामसेवक संघटनेचे सुनिल नागरे हे उपस्थित होते .
यावेळी ग्रामसेवक संघटना व शिक्षण संघटनांच्या वतीने बायोमेट्रिक प्रणालीला सकारात्मकतेने प्रतिसाद द्यावा व रोखलेले वेतन अदा करणे संबंधी येत्या २ दिवसात निर्णय घेतो , असे मा . गेडाम साहेबांनी सांगितले. अहिल्यानगर जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीत आपल्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटना यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावतो ,असे आश्वासन दिले
तसेच मागील महिन्याच्या पगाराबाबतही योग्य मार्ग काढावा असे रोहोकले गुरूजी यांनी विनंती केली व तसे आश्वासनही साहेबानी दिले आहे .
तसेच
महत्वाचे म्हणजे
आपल्या सर्व मुख्याध्यापकांनी म्हणजेच डीडीओ १ यांनी सर्व शिक्षकांचे पगार बिल फॉरवर्ड करावीत .कोणाचेही attach अथवा detach करू नये म्हणजे QR हजेरी नोंद केली नाही म्हणून त्यांना वगळून बिल तयार करू नये अशा समन्वय समितीच्या वतीने सूचना दिलेल्या आहेत .
तरी सर्व मुख्याध्यापकांनी आपले शालार्थ बिल बनवताना शाळेतील सर्व शिक्षकांचे पगार बिल फॉरवर्ड करावे .






