संभाजीराजे छत्रपती समर्थकांकडून सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले जात आहे. हे पोस्टर अल्पावधीत व्हायरल झाले आहे. ‘आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार’, असा मजकूर या पोस्टरवर लिहला आहे. या माध्यमातून संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेना आणि महाविकासआघाडीला एकप्रकारे इशारा देण्यात आला आहे. शिवसेनेने संभाजीराजे यांच्याशी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी गद्दारी केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा मिळाला नाही तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरात शिरू, असा इशाराही मराठा संघटनांकडून देण्यात आला होता. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.