अहिल्यानगर जिल्हयातील प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-2 मधील घरकुल लाभार्थींना मंजुरी

0
49

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-2 मधील घरकुल लाभार्थींना मंजुरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम-

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत सन 2024-25 मध्ये महाराष्ट्र राज्याला क्रेंद्र शासनाकडुन 20 लक्ष लाभार्थींचे वाढीव उद्दिष्ट देण्यात आले. प्राप्त 20 लक्ष उद्दिष्टापैकी महाराष्ट्र राज्याने 18.25 लक्ष (93%) लाभार्थींना घरकुले मंजुर केले आहेत, मंजुरीची प्रक्रिया राज्यात 15 दिवसात पुर्ण करण्यात आली.
अहिल्यानगर जिल्हयासाठी 82968 घरकुल लाभार्थींचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यापैकी 81015 (97.6%) लाभार्थींना घरकुले मंजुर केले आहेत सदरची प्रक्रिया ही जिल्हयाने 8 दिवसात पुर्ण करण्यात आले. घरकुल मंजुर झालेल्या लाभार्थींना मंजुरी पत्र देणे व मंजुर लाभार्थींपैकी 10 लक्ष लाभार्थींना प्रथम हप्ता एकाच वेळी (ऑनलाईन एकाच क्लिकवर) वितरण दि. 22/02/2025 रोजी दु. 4.45 वा. मा.ना. अमित शाह, केंद्रीय गृह मंत्री, भारत सरकार यांच्या शुभहस्ते तसेच मा. ना. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, मा. ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, मा. ना. अजित पवार, उपमुख्यमंत्री, मा.ना. जयकुमार गोरे, ग्रामविकास व पंचायतराज़ मंत्री, मा.ना. योगेश कदम, राज्यमंत्री ग्रामविकास मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरीत करण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रम बालेवाडी, पुणे येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आभाशी दुरदृष्यप्रणालीव्दारे जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-2 मधील घरकुल लाभार्थींना मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावर मा.ना.सभापती, विधानपरीषद, महाराष्ट्र राज्य, मा.ना.पालकमंत्री, मा.खासदार व मा.आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार सभागृह, स्टेशन रोड, अहिल्यानगर येथे, तालुकास्तरावर मा. आमदार यांच्या अध्यक्षतेखाली आभाशी दुरदृष्यप्रणालीव्दारे आयोजीत करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा आयोजीत करुन लाभार्थींना सरपंच व गावातील प्रतिष्टीत व्यक्तिंच्या शुभहस्ते मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण पत्र देण्यात येणार आहे.
अहिल्यानगर जिल्हयातील एकुण 81015 लाभार्थींना घरकुल मंजुरीचे पत्र व शासनाने प्रथम हप्ता वितरणासाठी दिलेल्या 46196 उद्दिष्टापेक्षा जास्त 50174 (109%) लाभार्थींना प्रथम हप्त्याचे वितरण होणार आहे.