केडगाव: श्री संदीप हदगल यांची सहायक अधिक्षक डाकघर पश्चिम उपविभाग अहमदनगर यापदी पदोन्नती झालेबदल केडगाव पोस्टऑफिसच्या वतीने सत्कार सभारभ करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री झावरे सर हे होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसंगी बोलताना श्री संतोष यादव म्हणाले की,श्री संदीप हदगल यांनी आपल्या सेवेस कोल्हापूर डाक विभागातून प्रारंभ केला ,त्यानंतर खातेअतर्गत परीक्षा उत्तीर्ण होऊन डाक निरीक्षकपदी निवड झाली, त्यानी वाई (सातारा) व अहमदनगर विभागीय कार्यालय येथे डाक निरीक्षकपदी यशस्वी काम करून आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटवला. प्रशासकीय काम करत असताना कर्मचाऱ्याची मुलभुत समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले.त्यातूनच त्याचीओळख ही कर्मचाऱ्याच्या प्रश्नांची जाण असणारे अधिकारी अशी झाली.
मा संदीप हदगल यांची नुकतीच सहायक अधिक्षक डाकघरपदी पदोन्नती झालेबदल त्यानी आपल्या कामास सुरवात केडगाव पोस्ट ऑफिसमधील महिला प्रधान अभिकर्ते यांच्याशी संवाद साधत केली.
श्री संदीपजी हदगल बोलताना म्हणाले की,महिला प्रधान अभिकर्ते हे घरोघरी जात पोस्टच्या योजना या सर्वांपर्यंत पोहचवत आहेत त्याच्याच माध्यमातून पोस्ट ऑफिसचे मोठे काम होत आहे त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र आहेत.
अहमदनगर विभागात संपुर्ण मे महिन्यात मिशन 50000 राबविले जात असून त्यास अहमदनगर विभागात चांगला प्रतिसाद मिळत असून,महिला प्रधान अभिकर्ते यांना आवाहन करत ,केडगाव परिसरात 52 अभिकर्ते कार्यरत असून आपल्या मार्फत प्रत्येक घरी पोस्टचे खातेदार असावेत अशी अपेक्षा व्यक्त करत या मिशनमध्ये आपला सकारात्मक सहभाग अपेक्षित आहे .
याप्रसंगी श्री पालवे महाराज,श्री स्वप्नील शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास श्री रोहिदास रोहकले, दत्तात्रय कुलकर्णी, श्री प्रमोद देव, श्रीमती संगीता शर्मा,श्रीमती अस्मिता कुलकर्णी,श्रीमती पंकजा धर्म,श्रीमती वंदना संचेती, श्रीमती सविता ताकपेरे, श्रीमती शुभांगी मांडगे,श्री शिवाजी कांबळे, श्री भाऊ श्रीमंदिलकर, श्री अनिल धनावत, श्री स्वप्नील पवार,श्री अंबादास सुद्रीक,श्री बाबासाहेब बुट्टे मोठ्या संख्येने अभिकर्ते, ग्रामीण डाक सेवक,व अहमदनगर आर एस मधील कर्मचारी उपस्थित होते.






