जलवाहिनीचे काम तातडीने पुर्ण केले नाही, तर शिवसेना संबधीत ठेकेदाराला झोडपणार!

0
780

६ महिन्यात ५० वेळा फुटली बुऱ्हाणनगर योजनेची जलवाहिनी

नगर – सोलापुर मार्गाच्या कामाचा परिणाम : शिवसेनेने दिली ठेकेदाराला समज

नगर -सोलापूर महामार्गावर चालू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे बुऱ्हाणनगर पाणी योजनेची जलवाहिनी ६ महिन्यात तब्बल ५० वेळा फुटल्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे . जलवाहिनीच्या सततच्या मोडतोडीमुळे या मार्गालगतच्या गावांना नाहक पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे .जलवाहिनीचे काम तातडीने पुर्ण केले नाही तर शिवसेना स्टाईल संबधीत ठेकेदाराला झोडपणार असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला .
नगर सोलापूर राज्यमार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम जेएचव्ही कंपनी मार्फत युध्दपातळीवर चालू आहे . याच मार्गाने बुऱ्हाणनगर योजनेची जलवाहिनी गेली आहे . या जलवाहिनीतुन दरेवाडी,वाटेफळ, वांळुज,शिराढोण,वाटेफळ, दहीगाव , साकत , पारगाव रुईछत्तीसी, या आठ गावाना पाणी पुरवठा होत आहे . राज्यमार्ग रुंदीकरणाचे काम करत असताना संबधीत ठेकेदार जलवाहिनीच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या भागातील जलवाहिनी वांरवार फुटत आहे .जलवाहिनीसाठी वापरले गेलेले पाईप मजबुत स्थितीत आहेत . मात्र जेसीबी चालक कुठलाही विचार न करत जलवाहिनीवर जोराने घाव टाकत आहे. परीणामी जलवाहिनीचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे . यामुळे या भागातील पाणी पुरवठा वारंवार बंद होतो . परिणामी या भागातील गावांना नाहक पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे . फुटलेल्या जलवाहिनीची एक दुरुस्ती काढण्यासाठी एक दिवस लागत आहे . दर दोन तीन दिवसानी हि जलवाहिनी फुटत आहे . यामुळे या भागात पाणी पुरवठा होत नाही .आतापर्यत सहा महिन्यात फक्त जेमतेम दहा वेळेस पाणी सोडण्यात आले .पाणीच मिळत नसताना .विनाकारण पाणीपट्टी भरण्याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. या भागात क्षारयुक्त पाणी असल्यामुळे टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागते . काही जण जारचे पाणी विकत घेऊन आपल्या परिवाराची तहान भागवत आहेत .
काल दि. ९ रोजी शिराढोण येथे जलवाहिनी फुटली असता शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांच्यासह युवा सेनेचे तालुकाप्रमुख प्रविण गोरे, सागर मते , सोमनाथ गोरे , भाऊ बेरड, बाबा करांडे, विलास शेडाळे, नाना गायकवाड यांनी या ठिकाणी भेट देऊन संबधीत ठेकेदाराला चांगलीच समज दिली . परत जलवाहिनी फुटणार नाही याची काळजी घेऊ असे ठेकेदारांनी सांगीतले .परत जलवाहिनी फुटली तर संबधीत ठेकेदार सहीत कर्मचाऱ्याना झोडपून काढू असा लेखी स्वरुपात इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला .
नगर -सोलापुर मार्गाचे रूंदीकरणाचे काम करत असताना बुऱ्हाणनगर जलवाहिनीची काळजी घेतली जात नाही . यामुळे सतत जलवाहिनी फुटुन पाणी पुरवठा ठप्प होतो .८ गावांना विनाकारण पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते . यामुळे पुन्हा जलवाहिनी फुटणार नाही असी समज ठेकेदाराला दिली .या मार्गावरून पंढरपूर येथे दिंडीला जाण्यासाठी वारकऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात असते. या भक्तांना पाण्याची गैरसोय होऊ शकते तेव्हा तातडीने जलवाहिनीचा प्रश्न सोडवावा. ”
. —संदेश कार्ले ( शिवसेना उपजिल्हाप्रमुख