हातात नंग्या तलवारी घेवून समाजात दहशत निर्माण करणार्या व पोलीस पथकालाही तलवारीचा धाक दाखवून पसार झालेल्या दोघा कुख्यात गुन्हेगार भावांमधील एकाला अटक करण्यात संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांना यश आले आहे.
सदरचा प्रकार गेल्यावर्षी मार्चमध्ये घडला होता, तेव्हापासून हे दोघेही पसार होते. मात्र बुधवारी कोल्हेवाडी रोड परिसरात पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत त्या दोघांतील सलीम अकबर पठाण याला जेरबंद केले आहे. त्याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पाच, तर शिर्डी पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत.






